पु ल मराठी साहित्यातील हास्याचा अखंड वाहणारा झरा
पु ल च साहित्यातील वैभव पु ल उर्फ भाईं चा आज जन्मदिवस भाई जन्माला आलेत आणि येतानाच मराठीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या उद्देशानेच जणू ! पु लं म्हणजे मराठी साहित्यातील अथांग सागर आणि त्यांच प्रत्येक लिखाण म्हणजेच मराठी माणसाच्या मनाच्या संवेदनशील किनाऱ्याला येऊन भिडणाऱ्या लाटाच जणू ..पु ल च साहित्यातल अफाट शौर्य आज ही मराठी मनाला वेड लावत शब्दांची गांभीर्यात आज ही प्रत्येक मराठी मानसला विचार करण्यास भाग पाडते पु ल चे नावाजलेले साहित्य पु ल ची "बटाट्याची चाळ" म्हणजे हास्यच कल्लोळ "व्यक्ती आणि वल्ली" आज ही अनेकांच्या मनामध्ये या व्यक्तिरेखेने घर केलंय "असा मी आसामी" हे त्यांच काल्पनिक आत्मचरित्र आजही अगदी खरंखुरं वाटत. अपूर्वाई , पूर्वरंग हे त्याचे बाहेरच्या देशांमध्ये भटकांती करताना लिहिलेले प्रवासवर्णनं आज ही सगळ्यांना मोहून टाकता. हासावणूक, अघळ पघळ , गणगोत , गोळाबेरीज , ती फुलराणी, नस्ती उठाठेव या सगळ्या त्यांच्या विनोदी कथा , काल्पनिक आत्मचरित्र , नाटक अवघ्या महाराष्ट्राच्या वाच्य रसिकांच्या घराघरात जाऊन पोहचल्या. "एक शून्य मी" या ...