विदा-मराठी साहित्याच विद्यापीठ
एक प्रतिभावंत शब्दप्रभू अन् मराठीला ‘ज्ञानपीठ’चा बहुमान मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक!
वि दा तुम्ही मला भेटलात खर तर तुमच्याच कविता संग्रहातून तुमच्या कवितांनी अनेकदा मला त्यांच्या प्रेमात च पाडलं. अनेकदा त्याच्यावर केलेल्या अविरत प्रेमामुळेच त्या कविता हि मनसोक्त पणे माझ्या ओठांवर त्यांचं अधिराज्य गाजवू लागल्या तुमच्या कवितांनीच मला व्यासपीठ दिल व्यक्त होण्याचं माणसाने व्यक्त व्हावं दिलखुलास होऊन स्वतःसाठी जगता जगता लोकांसाठी हि जगावं हे हि तुमच्या कवितांनी च शिकवलं ......
इंग्रजीतून MA होऊनही मराठीच साहित्याबद्दल प्रेम
जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील घालवळ गावचा. घरची परिस्थिती तेव्हा अत्यंत हलाखीची, वडील गरीब शेतकरी. पण एका स्नेह्यांमुळे विंदांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इंग्रजी घेऊन एम.ए. झाल्यावर त्यांनी मुंबईला शिक्षकी पेशा स्वीकारला.
इंग्रजी काव्याचा अभ्यास करताना ब्राऊनिंग, हॉपकिन्स, एलिएटस् यांच्या कवितांनी ते खूप प्रभावित झाले. तसेच मराठीतील माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर यांच्या काव्याचाही त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या प्रारंभीच्या काव्यातून जाणवतो.
वि दा च्या कवितांवर फिदा होण्याचं भाग्य
विंदा च्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य , विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा , गांभीर्य आणि मिस्किलपणा , प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणार्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते.
वि दा तुमच्या कवितांतून संत तुकाराम महाराजांच्या काव्यातला परखडपणा व आशयघनता दिसून येते. त्यांच्या वेगळ्या जाणिवा, वेगळ्या प्रतिमा रसिकांना खिळवून ठेवतात.
‘मी च्या वेलांटीचा सुटो सुटो फास’ किंवा ‘अगा क्रियापदा, तुझ्या हाती अर्थ। बाकी सारे व्यर्थ, भाषेलागी।’
यातून त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.
‘देणार्याने देत जावे - घेणार्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस - देणार्याचे हात घ्यावे’
हि कविता अनेकदा पुटपुटतो मी .
परी ग परी , राणी ची बाग , सशाचे कान अशे बालकविता लिहिणारे वि दा
"चुकले दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुसफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचं म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे"
असेही शब्द उमटवू शकतात यातून वि दा ची शब्दसाधना प्रखरपणे दिसून येते
किंवा
‘तीर्थाटन मी करीत पोचलो, नकळत शेवट तव दारी, अन् तुझिया देहात गवसली, सखये मज तीर्थे सारी’
हि तरुणाईला प्रेमाचं भुरळ पडणारी कविताही विलक्षण परिणाम साधते.
पुरस्कारांचे मानकरी
विंदा करंदीकरांना त्यांच्या साहित्यातील देदिप्यमान कारकीर्दीसाठी जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, सिनियर फुलब्राईट बहुमान असे अनेक पुरस्कार मिळाले. पण सर्वांत महत्त्वाचा, मानाचे पीस खोवणारा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार! या पुरस्काराने मराठी साहित्याचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय स्तरावर, खर्या अर्थाने फडकला.
साहित्याबद्दलची वि दां ची खंत
विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.
gr8 dada..❣️
ReplyDeleteAwesome blog Shree 👌
ReplyDeleteApratim Shree...
ReplyDeleteसुरेख लेखणी श्रीकांत तुला शुभेच्छा
ReplyDeleteअतिशय सुरेख लिहिलं आहे 👏🏻👏🏻
ReplyDeleteअप्रतिम......!! हा लेख वाचून वि .दा. करंदीकर यांचे सर्व साहित्य वाचण्याचं मन होतंय!! Keep it up Shree Bhau...!
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteया लेख मधुन खुप काही अनुभव आणि शिक्षण भेटले
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख ...विंदाच्या कविता ...त्यांचा आशय खूपच छान टिपला आहे ...श्रीकांत अनेक शुभेच्छा ....
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख ... विंदांच्या कविता , त्यातील आशय , त्यातील वेगळेपण ..खूपच छान टिपले आहे ... श्रीकांत अनेक शुभेच्छा ....
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteNice blog shree
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDeleteNice👌👌
ReplyDelete