छत्रपतींचा इतिहास आणि विश्रामगडाची भटकंती





   महाराष्ट्राला पडलेलं जिवंत स्वप्न

छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं जिवंत स्वप्न, साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांनंतरही मराठी मनांचा ठाव घेणारं. सह्याद्रीतल्या कुठल्याही गड किल्ल्याच्या तटावर उभे राहा किंवा डोंगरदऱ्यांच्या काठावर, एखाद्या कड्याला भिडा महाराजांची आठवण झाली नाही तरच नवलं! साक्षात शिवरायांच्या सहवासाने पवित्र झालेल्या पट्टा किल्यावर अर्थात विश्रामगडावर भटकंतीचा योग आम्हाला लाभला.

    प्रवासवर्णन

आम्ही 6 सह्यवेडे पट्टा किल्याकडे निघालो, तेही भल्या सकाळी 8 च्या सुमारास  पावसाळी कुंद वातावरणाचा पाश भेदत. हिवरगाव आंबरे येथे एका पाहुण्याचे येथे गरमागरम वाफाळलेला चहा घेतला आणि स्वतःशीच पुटपुटलो चहा पिऊन अश्या ठिकाणी तर निघालोय ना ? जिथे माणसाची गर्दी कमी असेन... पुढे  एक छोटासा घाट पार होईपर्यंत पाऊसभरल्या धबधब्यांनी आमच मन वेढलं. त्यात समशेरपूर मध्ये गरमागरम कांदा भजी बघितल्यावर कोरोनाची भीतीही संपल्यागत आम्ही शेवटी तिथली भजी घेतलीच आणि निघालो. मनातली भीती जर घालवायची असेन तर या सह्याद्रीच्या वाटा तुडवयाला पाहिजे..कधी धडकी भरवनारा भला मोठा धबधबा.. धुक्यात गायब झालेली घाटवाट. समोर आभाळला टेकणारी मोठी मोठी डोंगर.. या सगळ्या गोष्टीनी माणूस खरच खूप निडर बनतो..खरं तर आयुष्य हे काही comfert zone मध्ये जगण्यासाठी मुळीच नाही बनलेल....

     छत्रपतींचा पुतळा आणि सिनेमास्कोप नजराणा

शेवटी पोहचलो पट्टेवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्याश्या पाड्यातच. किल्ल्यावर जाण्याची पूर्वापार वाट आता इतिहासजमा झाली आहे. वनखात्याच्या जीर्णोद्धार योजनेमुळे गाडी थेट पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचली. प्रवेशव्दाराजवळ जाईपर्यंत मनात किल्ल्याबद्दल च कुतूहल आणि चेहर्यावर इतक्या दिवसातून घराबाहेर पडल्याचं आनंद जास्त होता. दगडाच्या पायऱ्यांवरुन चालत आम्ही प्रवेशद्वाराच्या 100 मीटर मधी गेल्यावर डाव्या बाजूला असणाऱ्या हत्तीच्या पुतळ्यापाशीच आमच्या बॅग्स आणि हेल्मेट ठेवलं . तिथून उजव्या दिशेने देवीच्या गुहेतल्या मंदिरापर्यंत गेलो.  डावीकडे उंचावर चक्क शहरीबाज असलेलं पूर्वाभिमुख मंदिर होतं. तिथून पूर्व दिशेचा १८० अंश डिग्रीतला सिनेमास्कोप नजराणा फारचं नेत्रसुखद होता.

मंदिराच्या लगतच अंबरखान्याकडे जाणारी वाट होती. शिवरायांची आठवण आली तोच समोर शिवरायांचा पुतळा दिसला. महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आणि हळुवार पावलांनी माथा गाठला. तीन टप्प्यात किल्ल्याचा विस्तार दक्षिणोत्तर धावलेला होता.  आजूबाजूला  मोजताना चुकतील इतके पाण्याचे छोटे छोटे डबके सापडले. त्यात समोर च एक मोठी पाटी नजरेसमोर आली घोड्यांसाठी पाणी पिण्याची जागा. आणि जरास समोरच पाण्याचं कुंड दिसलं आम्ही तिथेच थोडा विसावा घेत एकदाचे सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. भन्नाट वाऱ्यानं आम्हाला अक्षरश: हादरवून टाकलं.  समोर उत्तरेकडे दिसणाऱ्या पाऊसभरल्या ढगांचं साम्राज्य त्या सुसाट वाऱ्यापुढे हतबल झालं. पट्टा किल्ल्यावरील पश्चिम कड्यावरुन दूरपर्यंतचा मुलूख न्याहाळतांना, भन्नाट वाऱ्यासोबत धुक्याचा पाठशिवणीचा खेळ अनुभवताना मनात शिवरायांबद्दलच्या अनंत आठवणींनी हलकल्लोळ माजला.

इथे महाराज कुठे-कुठे फिरले असतील? कुठे बसले असतील? याचा अंदाज बांधायचा प्रयत्नच जणू मन करत होतं. नुसत्या विचारांनीही भरुन आल्यासारखं झालं. स्पर्श करणाऱ्या त्या वाऱ्यांगत म्हाराजांच वास्तव्य जणू आम्हांला आजही स्पर्श करतंय असा आभास वाटत होता.

तिनशे पासष्ट

वर्षांनंतरही एक असामान्य मनुष्य, त्याचे सगेसोबती अन् त्यांचा ध्यास आजही या बाजारु जगाला हलवून टाकतो हे इतकं सहज, सोपं नाही. त्यामागे काही तरी अलौकीक आहे एवढं मात्र निश्चित! इथल्या धुंद झालेल्या निसर्गाशी मुक संवाद साधण्याचा प्रयत्न झाला नि परतीच्या वाटेला भिडलो.  एकदा की तुम्ही daily routine मधून बाहेर पडले आणि एखादा दिवस असा जगून बघितला तर आयुष्याचा महोत्सव साजरा केल्यासारखी फीलिंग नक्की येते....

सन १६७९ नोव्हेंबर १६. महाराज जालना शहरावरील स्वारी करुन रायगडाकडे परतीला निघाले, ही गोष्ट मोगल सरदार रणमस्तखान याला समजली. तो संगमनेर परिसरात शिवरायांना गाठणार अशी कुणकुण बहिर्जी नाईक या गुप्तहेरांच्या प्रमुखास लागली. तेव्हा तत्परतेने व चालाखीने त्याने थेट रायगडावर जाण्याच्या मार्गात बदल करुन वेगळ्याच मार्गाने शिवरायांना पट्टा किल्यावर आणले. खरं तर सततच्या मोहिमांमुळे महाराज खूप थकले होते. त्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. याची जाणीव नाईकांना झाली नि शिवराय चक्क सतरा दिवस येथे आरामासाठी थांबले (असे इतिहास सांगतो). तेव्हाच राजांनी या किल्ल्याचं नाव विश्रामगड ठेवलं. 

      पट्टा किल्ला

उपनाव - विश्रामगड तालुका - अकोले जिल्हा - अहमदनगर उंची - १३९१ मीटर पायथ्याची गावे - पूर्वेला पट्टावाडी, दक्षिणेला कोकणगाव तर उत्तरेला तिरडे गाव गाडीमार्ग - संगमनेर- घुलेवाडी -सायखिंडी-चिकणी - हिवरगाव आंबरे- देवठाण- समशेरपूर-ठाणगाव -पट्टेवाडी चढाई श्रेणी - सहज व सोपी वेळ - संपूर्ण किल्ला भटकंतीसाठी ३ ते ३.३० तास लागतात.


Comments

  1. अप्रतिम ...
    जणू वाचताना पट्टया किल्ल्याची भ्रमंती करतोय याचा भास होत होता....

    ReplyDelete
  2. ekdam chan Aaba. nice thinking power bhawa.

    ReplyDelete
  3. खूप सुंदर! वाचताना पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण झाली.

    ReplyDelete
  4. Shree bhau Ek number.....ज्वलंतपणे सर्व चित्र डोळ्यासमोर उभं केलंस तु.....Proud of you bhau keep it up.....!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you saurabh dada asach support krt raha 😍🤗

      Delete
  5. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे अजरामर राहतील 🚩🚩

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या काळात न्यायरूपी मातेच्या उदरातून जन्म घेणार आणि स्वराज्य निर्माण करून इतिहास घडवणारं अजरामर नेतृत्व 😍

      Delete
  6. Mast Shree Dada ...parat ekda maharaj athvle 😊

    ReplyDelete
    Replies
    1. जोपर्यंत हि सृष्टी आहे तोपर्यंत महाराज आठवत राहतील ..🤗😍

      Delete
  7. लेख वाचताना असे वाटले की स्वतः हा प्रत्यक्ष किल्ल्यावर भ्रमंती करतोय...
    खूप छान आज परत महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाची,किर्तीची आठवण झाली...🙏
    Keep it up Shree...Very Nice...blog👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you pamya bhai jaan कदाचित काळ बदलतील पण महाराजांच्या पराक्रमाचा आणि कीर्तीचा वाहता झरा कधी च संपणार नाही अखंड पणे पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये वाहत राहील

      Delete
    2. वर्ष जातील अनेक काळ जातील महाराज राहतील त्यांचे विचार राहतील...💯🚩

      Delete
  8. Replies
    1. गडाचे वर्णनं इतके हुबेहूब केले आहे की गड प्रत्यक्ष डोळ्या समोर उभा राहिला असाच छंद जोपासत रहा, नाहीतर आपल नेहमीच चालूच राहत

      Delete
    2. आहेर सर ,
      गडाचे वर्णन खूपच सुरेख व हुबेहूब केले आहे, प्रत्यक्ष गड डोळ्यासमोर उभा राहिला
      असाच छंद मना पासून जोपासत जा All the best

      Delete
  9. लेखन,भाषासौंदर्य आणि प्रवास वर्णनातील बारकावे सगळंच उत्तम👌👌

    ReplyDelete
  10. Meaningful and awesome writing .Keep it up👍

    ReplyDelete

Post a Comment