पु ल मराठी साहित्यातील हास्याचा अखंड वाहणारा झरा




 पु ल च साहित्यातील वैभव 

पु ल उर्फ भाईं चा आज जन्मदिवस भाई जन्माला आलेत आणि येतानाच मराठीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या उद्देशानेच जणू ! पु लं म्हणजे मराठी साहित्यातील अथांग सागर आणि त्यांच प्रत्येक लिखाण म्हणजेच मराठी माणसाच्या मनाच्या संवेदनशील किनाऱ्याला येऊन भिडणाऱ्या लाटाच जणू ..पु ल च साहित्यातल अफाट शौर्य आज ही मराठी मनाला वेड लावत शब्दांची गांभीर्यात आज ही प्रत्येक मराठी मानसला विचार करण्यास भाग पाडते 

पु ल चे नावाजलेले साहित्य 

पु ल ची "बटाट्याची चाळ" म्हणजे हास्यच कल्लोळ

"व्यक्ती आणि वल्ली" आज ही अनेकांच्या मनामध्ये या व्यक्तिरेखेने घर केलंय 

"असा मी आसामी" हे त्यांच काल्पनिक आत्मचरित्र आजही अगदी खरंखुरं वाटत. 

अपूर्वाई , पूर्वरंग हे त्याचे बाहेरच्या देशांमध्ये भटकांती करताना लिहिलेले प्रवासवर्णनं आज ही सगळ्यांना मोहून टाकता.

हासावणूक, अघळ पघळ , गणगोत , गोळाबेरीज , ती फुलराणी, नस्ती उठाठेव या सगळ्या त्यांच्या विनोदी कथा , काल्पनिक आत्मचरित्र , नाटक अवघ्या महाराष्ट्राच्या वाच्य रसिकांच्या घराघरात जाऊन पोहचल्या.

"एक शून्य मी" या त्याच्या लेखातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात या लेखातून सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन घडतं..

त्यांची विनोदी कविता कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती मी संगीतावर प्रेम करावे ही त्यांची कविता प्रत्येक कॉलेज कुमार आणि कुमारीच्या मनावर आज ही अधिराज्य गाजवते

एका सुंदर नात्यावर लिहलेलीं मैत्री हि पु ल ची कविता आज ही मैत्रीच्या दुनियेत मनसोक्त तीच अस्तित्व उभं करते 

शेवटी मराठीवर प्रेम दाखवत हि त्यांनी इंग्रजी ची उडविलेली खिल्ली खालील कवितेतून दिसते पु ल म्हणता

आफ्टर ऑल मराठी

कंप्लसरी पाहिजे .

कारण आपल्या मदर टंग

मधून आपले विचार जितके 

क्लिअरली एक्सप्रेस करता येतात 

तितके फॉरेण लँग्वेज ,

मधून करन डिफिकल्ट जात.

इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल .

"माणसाचे केस गेलेली असतील तरी चालतील पण मानुस हा गेलेली केस असू नये" हि त्यांची शब्दांची जुगलबंदी खासच.

पुरस्कारांचे मानकरी पु ल 

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकहोते. त्यासाठी त्यांना दिनेश ठाकूरपुरस्कार पद्मश्री सन्मान , महाराष्ट्र भूषण ,साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार अशे अनेक पूरस्कार मिळाले.

पु ल ची अविस्मरणीय मुलाखत 

सन १९६०च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यातील संवाद पहा :


वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता, हीच वरात तुम्ही आता वाऱ्यावर सोडली आहे, हे खरे आहे का? असं वसंतराव म्हणाले!


पुलं : वाऱ्या'चीच गोष्ट काढली आहे म्हणून सांगतो...भावगीत गायक झालो तो काळ 'वारा फोफावला'चा होता.


नट झालो नसतो तर 'वारा'वर जेवायची वेळ आली असती.


शिक्षक झालो तेव्हा ध्येयवादाचा 'वारा' प्यायलो होतो.


संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा पेटीत 'वारा' भरून सूर काढत होतो.


नाट्य दिग्दर्शक झालो तेव्हा बेकार 'आ-वारा' होतो.प्राध्यापक झालो तेव्हा 'विद्वत्तेचा वारा' अंगावरून गेला होता.


पटकथा लिहिल्या त्या 'वाऱ्या'वर उडून गेल्या.


नुसताच साहित्यिक झालो असतो तर, कुणी 'वाऱ्याला'ही उभे राहिले नसते.


आणि ही सर्व सोंगे करताना फक्त एकच खबरदारी घेतली, ती म्हणजे 'कानात वारा' न शिरू देण्याची'


आयुष्यात अनेक प्रकारच्या 'वाऱ्यांतून हिंडलो'. त्यांतून जे जिवंत कण डोळ्यात गेले, ते साठवले आणि त्यांचीत 'वरात' काढली.


लोक हसतात... माझ्या डोळ्यांत आतल्याआत कृतज्ञतेचे पाणी येते, आणि म्हणूनच अंगाला 'अहंकाराचा वारा' लागत नाही.

अश्या शब्दांच्या प्रेरणादायी विचारवंताला शतशः कोटी कोटी प्रणाम पु ल च्या या सगळ्या साहित्याला आपण आपल्या विचारात भिनवण्याच काम आज त्याच्या जन्मदिनी करूया ..


Comments

  1. खूप च छान शब्दात पु ल म्हणजे अपल्यासाठी देवघरची फुल हेच तू दाखवून दिलं

    ReplyDelete
  2. खूप छान श्रीकांत, पु ल देशपांडे यांचे मराठी भाषा, साहित्य, कला यामध्ये खूप मोलाचे योगदान आहे . आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणी चा या लेखात अतिशय चांगल्या प्रकारे उजाळा....

    ReplyDelete
  3. छान श्रीकांत 💯👌👍

    ReplyDelete
  4. पु ल च ज्वलंत स्वरूप मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तू खूप सुंदर 🤩🔥🤗

    ReplyDelete

Post a Comment