ती आणि मी #couplechallenge


ती आणि माझं Relation,

 खरं सुरु झालं मी पहिल्यांदा घरापासून दुरवल्यावर घरी होतो तोपर्यंत अशी कोणीतरी ती आपल्याही आयुष्यात असावी असं कधी वाटलंच नाही. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कळल कि ती आता सोबत असायला हवी मग असाच तिच्या शोधात निघालो आणि एका दुकानात उभं असताना माझी तिच्यावर नजर पडली.... आणि मग तिला बघताच क्षणी ती मला खूप जास्त आवडली पुढे मग मी तिला माझा आधारच बनवलं.

तिचा आणि माझा प्रवास 

मग सुरु झाला तिचा आणि माझा प्रवास . तिची आणि माझी समोरासमोर भेट तशी आठवड्यातून 2 वेळा का होईना व्हायची, पण भेट जरी आठवड्यातून 2 वेळा होत असली तरी मी तिला मनापासून जीव लावायचो. आणि तिला हि मी वाचलेल्या पुस्तकांच्या गप्पा खुप आवडायच्या कारण त्या फक्त मी तिच्यासमोर च व्यक्त करायचो माझी प्रत्येक गुपितं तिला माहित असायचे. माझी प्रत्येक गुपित मी तिच्या हृदयावर कोरून ठेवलीत आजही ते तसेच तिने जपून ठेवलेत....नाही असं नाही!

तिने दिलेली प्रेरणा

जेव्हा जेव्हा मी काही गोष्टींनि खचतो तेव्हा तेव्हा आजही ती मला प्रेरित करते कारण तिने दिलेल सर्व कुठं न कुठं कामी पडलंय माझ्या आई आणि बापनंतर मी केलेल्या श्वासागणिक प्रामाणिक प्रेमाची परत फेड कुणी केली असेल तर ती तिनेच...

तिच सौंदर्य 

कारण शब्दांच सौंदर्य आवडलं कि बाह्य जगातल कुठलंही सौंदर्य माणसाला भुरळ पाडत नाही .. आजच्या जगात मला हेच हवं ये तेच हवंय असं पैश्यावर प्रेम करणाऱ्यामधली ती मुळीच नाही. आजच्या काळात खर प्रेम करणारी ही साथ देत नाही तेव्हा त्या देतील याची शाश्वती काय? पण माझी ती... या सगळ्यापेक्षा वेगळी ये हो तिने हि मागितलं न माझ्याकडे, पण काय? तर ते सांगताना हि मला तीच माझ्यावरच प्रेमच दिसून येतंय. तिनेही मागितली माझ्याकडे प्रामाणिक साथ जीवापाड प्रेम आणि अखंड सातत्य .. म्हणून बघा मित्रानो तुम्हाला हि प्रेम करायच असेल तर तिच्यावर करा. कारण तिच्या प्रेमात पडल्यावर मिळणार समाधान हे जगातील सर्वोच संमधानापेक्षा सरस असत... 

आणि हो मित्रानो सांगायचं राहूनच गेलं ती माझी डायरी होती. पुन्हा गैरसमज नको आधीच क्लिअर करतो.😅🤘


Comments

  1. Best 😍 & Especially the Part Killer😂💯🤘

    ReplyDelete
    Replies
    1. Imagination level....Very High while reading and especially that last line Mazhi Diary😀😀 Very well scripted.......!!Keep it up Shree.....!!

      Delete
    2. Thank you saurabh dada 🤘😇🤗😍😍

      Delete
  2. It's amaze
    Sometime talking with ourself works..
    Your diary relationship makes me inspire for doing something like this
    Too good Broda....

    ReplyDelete
  3. It's amaze
    Sometime talking with ourself works..
    Your diary relationship makes me inspire for doing something like this
    Too good Broda....

    ReplyDelete
  4. Khupch sunder....keep it up👍🤗

    ReplyDelete
  5. Kya baat he chikku 😍 Keep it up 👍

    ReplyDelete

Post a Comment