"ही कहाणी आहे... शांततेने इतिहास लिहिणाऱ्या एका अजिंक्य योद्ध्याची!" @AjinkyaRahane❤️🏏


"ही कहाणी आहे... शांततेने इतिहास लिहिणाऱ्या एका अजिंक्य योद्ध्याची!"

"लफ़्ज़ कम थे, मगर किरदार बड़ा था,
वो भीड़ का नहीं... इतिहास का हिस्सा बना था।" 
 
ह्या शायरीला साजेस अस भारताच अजिंक्य नेतृत्व  !

"काही व्यक्ती यशासाठी आवाज करतात... तर काही व्यक्ती आपल्या शांततेने यशाला अर्थ देतात."
ही कहाणी आहे... एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या स्वप्नाळू तरुणाची.
ही कहाणी आहे... संयम, शिस्त, जिद्द आणि निस्वार्थपणे संघासाठी लढणाऱ्या एका असामान्य क्रिकेटपटूची.
ही कहाणी आहे... प्रत्येक अपयशाला उत्तर शब्दांनी नाही, तर आपल्या बॅटने देणाऱ्या एका सज्जन खेळाडूची.
ही कहाणी आहे... भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शांत, पण तितक्याच प्रभावी नेतृत्वाची.
आणि ही कहाणी आहे...
अजिंक्य रहाणेची!

कर्मावर विश्वास ठेवा... परिणाम स्वतः तुमच्याकडे चालत येतील."
हे वाक्य जर एखाद्या क्रिकेटपटूच्या आयुष्याने सिद्ध केलं असेल, तर ते अजिंक्य रहाणे यांच्या 
त्यांनी कधी प्रसिद्धीचा पाठलाग केला नाही...
त्यांनी फक्त आपल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला.
म्हणूनच...
जेव्हा विराट कोहली आक्रमकतेचं प्रतीक होता...
तेव्हा अजिंक्य रहाणे भारतीय संघाच्या संयमाच प्रतीक होता....
एक हिमालय...
आणि दुसरा सह्याद्री....
जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा  हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अस म्हणायला काही हरकत नाही....

अश्वी खुर्द ते भारतीय संघ

"जिनके सफ़र में काँटे होते हैं,
वही मंज़िल के सबसे क़रीब होते हैं।"

अहमदनगर जिल्ह्यातील अश्वी खुर्द या मातीत रुजलेली रहाणे कुटुंबाची नाळ आणि मुंबईच्या धावपळीतील बालपण...
या दोन गोष्टींनी अजिंक्य घडवला.
लहानपणापासूनच क्रिकेटच्या प्रेमात पडला.
दादरच्या शिवाजी पार्कवर...
घाम गाळत...
स्वप्नं पाहत...
आणि प्रत्येक सरावानंतर स्वतःला अधिक सक्षम बनवत...
प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न त्याने केला...
यातूनच एक दिवस भारतीय संघाचा विश्वास जन्माला आला...
या अथक प्रयत्नांच्या जोरावर त्याने भारताची निळी जर्सी परिधान केली.
भारतीय संघात पदार्पण करणं हे त्याचं स्वप्न होतं...
पण भारतीय क्रिकेटचा विश्वास बनणं...
हे त्याचं कर्तृत्व होतं....

विदेशातील भारताचा संकटमोचक

"वो भीड़ में सबसे अलग इसलिए था,
क्योंकि उसे ऊँचा दिखना नहीं... ऊँचा बनना था।"

भारतीय फलंदाजांना परदेशात संघर्ष करावा लागतो...
असं अनेकदा म्हटलं जायचं.
पण...
लॉर्ड्स...
मेलबर्न...
वेलिंग्टन...
कोलंबो...
किंग्स्टन...
जिथे भारतीय फलंदाज अडखळले...
तिथे रहाणे भक्कमपणे उभा राहिला.
लॉर्ड्सवरील २०१४ मधील शतक...
मेलबर्नमधील २०२० मधील शतक...
आणि परदेशात केलेल्या अनेक निर्णायक खेळी...
यांनी त्याला भारताचा सर्वात विश्वासार्ह कसोटी फलंदाज बनवलं.

३६ धावा... आणि इतिहास घडवणारा कर्णधार....

"जिसके किरदार में सच्चाई हो, उसे तालियों की ज़रूरत नहीं,
इतिहास ख़ुद उसके नाम का अध्याय लिख देता है।"

त्यातलाच हा एक अविस्मरणीय अध्याय होता..
अॅडलेड...
३६ धावा...
संपूर्ण जग भारतीय संघावर हसत होतं.
विराट भारतात परतला.
अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर.
सगळे म्हणत होते...
भारत मालिका हरणार.
पण...
एक माणूस शांत होता.
त्याने कुठलेही घोषणा केली नाही...
त्याने प्रत्येक चर्चेला उत्तर दिलं...
मेलबर्नच्या शतकाने....कॅप्टन Leading from front चा आवाज आजही त्या ऑस्ट्रेलियन संघाला झोपू देत नसेल.....
त्याने शुभमन गिलवर विश्वास ठेवला...
मोहम्मद सिराजवर विश्वास ठेवला...
शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, नटराजन यांच्यावर विश्वास ठेवला.
आणि...
गाबामध्ये ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला जिंकला.
त्या दिवशी भारताने सामना जिंकला नाही...
तर जगाला शिकवलं...

"परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन 
यह फैले हुए उनके पर बोलते हैं, 
अक्सर वह लोग खामोश रहते हैं जमाने में, 
जिनके हुनर बोलते हैं।"

त्याच शांत नेतृत्व हेच त्या परस्थितीत सर्वात प्रभावी नेतृत्व होत हे त्याने त्याच्या कर्तृत्वातून सिद्ध केलं.

विराटचा सर्वात विश्वासू साथीदार

"कुछ रिश्ते शब्दों से नहीं बनते,
भरोसे से बनते हैं।"

विराट कोहली आक्रमकतेचं प्रतीक होता...
तर अजिंक्य रहाणे संयमाचं.
दोघांनी मिळून भारतासाठी अनेक ऐतिहासिक भागीदाऱ्या उभ्या केल्या...
विराटने अनेकदा म्हटलं...
"Ajinkya is one of my favourite Test batting partners."
हा पुरस्कार कोणत्याही ट्रॉफीपेक्षा मोठा होता....
राधिका –  अजिंक्यच्या मैदानाबाहेरची शांत ताकद....

"हर कामयाब इंसान के पीछे,
एक ऐसा हाथ होता है...
जो कभी सुर्खियों में नहीं आता।"

क्रिकेटच्या मैदानावर अजिंक्य जितका शांत दिसतो...
तितकीच त्याच्या आयुष्यात स्थिरता आणणारी व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी राधिका.
बालपणापासूनची मैत्री...
विश्वासातून फुललेलं नातं...
आणि प्रसिद्धीच्या झोतातही साधेपणा जपणारं कुटुंब.
जेव्हा मैदानावर जग त्याच्याकडून धावांची अपेक्षा करत होतं...
तेव्हा घरात एक व्यक्ती त्याच्याकडून फक्त आनंदी राहण्याची अपेक्षा करत होती.
कदाचित म्हणूनच...
अजिंक्य प्रत्येक चढ-उतारात इतका स्थिर राहू शकला...

मैदानाबाहेरची संयमी खेळी...

"ऊँचा वही उठता है,
जो ज़मीन से जुड़ा रहता है।"

आजच्या सोशल मीडियाच्या युगात...
वाद विकले जातात...
प्रसिद्धी विकत घेतली जाते...
पण अजिंक्य रहाणेने आयुष्यभर नम्रता निवडली.
तो सहकाऱ्यांचा आदर करत राहिला ...
चाहत्यांशी साधेपणाने वागत राहिला ...
आणि प्रत्येक यशाचं श्रेय संघाला देत राहिला...
त्याला जेव्हा विचारलं गेलं तुझा फारसा PR नाही 
त्यावेळेस त्याने दिलेल उत्तर हे त्याच टीम गेम असणाऱ्या क्रिकेट बद्दलच प्रेम दर्शवणार होत क्रिकेट हा खेळ च माझा PR आहे मला कुठल्याही दुसऱ्या PR ची गरज नाही...म्हणत त्याने सगळ्यांना अचंबित केलं
म्हणूनच...
तो फक्त क्रिकेटपटू नाही..
तर या खेळाचा एक अविस्मरणीय सज्जन चारित्र्य (Unforgettable Gentlemen character) आहेस.

निवृत्ती नाही... अमरत्व

"कुछ लोग रिटायर होते हैं,
कुछ लोग दास्तान बन जाते हैं।"

आज अजिंक्य रहाणे मैदानाला निरोप देत आहे.
पण...
तो भारतीय क्रिकेटला कधीच सोडून जाणार नाही.
कारण...
जेव्हा गाबाची गोष्ट सांगितली जाईल...
जेव्हा लॉर्ड्सचं शतक आठवलं जाईल...
जेव्हा संकटात शांत राहणाऱ्या नेतृत्वच उदाहरण दिलं जाईल...
जेव्हा जेव्हा...
संयमाची व्याख्या लिहिली जाईल...
तेव्हा...
एक नाव कायम उच्चारलं जाईल...
अजिंक्य रहाणे....


"तुम्ही मला कधी परक मानलं नाही" अस मराठीत बोलून तुझं आपल्या मराठी मातीशी असलेल प्रेम तू क्रिकेट ला निरोप देतानाही दाखवून दिलं.....

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा म्हणणारा क्रिकेट च्या मैदानातील अजिंक्य योद्धा !

"वो हार से कभी डरा नहीं,
जीत पर कभी इतराया नहीं।
यही वजह है कि वक़्त ने भी,
उसे कभी भुलाया नहीं।"

धावा विसरल्या जातील...
विक्रम मोडले जातील...
स्कोअरकार्ड बदलतील...
पण...
३६ धावांनंतर खचलेल्या भारताला पुन्हा उभं करणारा तो शांत चेहरा...
लॉर्ड्सच्या बाल्कनीत तिरंगा उंचावणारा तो संयमी योद्धा...
विराटचा सर्वात विश्वासू साथीदार...
आणि भारतीय क्रिकेटचा अपराजित कसोटी कर्णधार...
इतिहास कधीच विसरणार नाही.
अजिंक्य!
तुझ्या बॅटने आम्हाला धावा दिल्या... पण तुझ्या आयुष्याने आम्हाला शिकवलं की आवाजापेक्षा स्वभाव मोठा असतो, आणि प्रसिद्धीपेक्षा चारित्र्य.

"रन किताबों में दर्ज रहेंगे...
लेकिन तुम्हारा किरदार हर भारतीय क्रिकेटप्रेमी के दिल में हमेशा ज़िंदा रहेगा

धन्यवाद, अजिंक्य!
तू फक्त भारताचा क्रिकेटपटू नव्हतास...
तू संयम, चारित्र्य आणि नेतृत्वाचा एक जिवंत धडा होतास.

सलाम... त्या शांत योद्ध्याला, ज्याचं नावच त्याचा परिचय आहे—अजिंक्य! 🇮🇳🏏❤️

हॅपी Retirement Dear Ajju ❣️

Comments

  1. खूप छान लेख लिहलाय तू Shree.... अनेकदा तुझ्या बोलण्यातून जाणवतं तुझं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे but आज हा लेख वाचताना ती संवेदनशीलता जाणवली जी तुला मराठी भाषेबद्दल आहे....तुझ्या लेखनात फक्त शब्द नाहीत, तर विचारांना स्पर्श करणारी संवेदनशीलता आहे,अजिंक्य रहाणेवरील हा ब्लॉग वाचताना पुन्हा एकदा तुझं मराठी साहित्यावरचं नितांत प्रेम जाणवलं....तुझ्या शब्दांमध्ये साधेपणा, खोली आणि प्रामाणिकपणा आहे. अशीच तुझी लेखणी अनेकांना प्रेरणा देत राहो...😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts